पछाडलेला सिनेमातील दुर्गा मावशीची लेक मनिषा आणि श्रेयस तळपदे यांची भन्नाट लव्ह स्टोरी पाहायला मिळाली होती.
अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी हिने दुर्गा मावशीच्या मुलीची मनिषाची भूमिका साकारणारी होती.
पछाडलेला सिनेमानंतर मात्र अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी सिनेक्षेत्रातून गायब झाली. पण तिची मनिषा ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली.
अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी सिनेसृष्टीपासून काहीशी लांबच आहे.
काही महिन्यांपूर्वी महेश मांजरेकर दिग्दर्शित 'नाय वरण भात लोनचा कोन नाय कोनचा' या सिनेमात अश्विनी दिसली होती.
दिग्याच्या काकीच्या भूमिकेत अश्विनी आपल्याला दिसली होती. तिच्या या भूमिकेची प्रचंड चर्चा देखील झाली होती.
सिनेमाच्या प्रमोशननिमित्त अश्विनीनं चला हवा येऊ द्या च्या मंचावरही हजेरी लावली होती.
त्याचप्रमाणे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर याच्या फत्तेशिकस्त या सिनेमातही अश्विनीने लहान भूमिके साकारली होती.
अश्विनी सिनेक्षेत्रात फारशी सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
अश्विनी तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अभिनयाबरोबरच तिला मॉडेलिंगचीही आवड आहे.
कधी स्टायलिश कधी पारंपरिक तर कधी बोल्ड लुकमध्ये अश्विनी सोशल मीडियावर दिसत असते.