यंदा अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील ऑस्कर 2023 च्या सोहळ्यात सहभागी झाली होती.
या सोहळ्यात अभिनेत्रीने केलेल्या लूकने सर्वाचंच लक्ष वेधलं.
दीपिकाने यावेळी खास काळ्या रंगाचा वेलवेट गाऊन घातला होता. ती यावेळी खूपच सुंदर दिसत होती.
ऑस्कर 2023 या सोहळयात दीपिका पदुकोणने भारताचं प्रतिनिधित्व केलं.
दीपिका पदुकोणने ऑस्कर 2023 च्या मंचावरून भाषण केलं. ती RRR चित्रपटातील नातू नातू या गाण्याबद्दल बोलत होती. पण तिच्या भाषणात ती वारंवार अडखळत होती.
याचं कारण म्हणजे ती नातू नातू या गाण्याबद्दल बोलत असताना प्रेक्षक देखील दमदार प्रतिसाद देत होते.
प्रेक्षकांचा उत्साह अनावर होऊन जोरदार टाळ्या वाजत होत्या, त्यामुळे दीपिकाला पुन्हा पुन्हा थांबावे लागले.
नातू नातू या गाण्याला ऑस्करमध्ये जो प्रतिसाद मिळाला ते पाहणे खरोखरच अद्भुत होते. त्याचा आनंद दीपिकाच्या चेहऱ्यावरही स्पष्ट दिसत होता.
दीपिकाने दिलेल्या या भाषणाची सध्या जोरदार चर्चा होत असून चाहते तिचं कौतुक करत आहेत.