आरआरआर सिनेमातील 'नाटू नाटू'या गाण्याने यंदाचा बेस्ट ओरिजिनल साँग कॅटेगिरीत ऑस्कर जिंकला आहे.
नाटू नाटू गाण्याने ऑस्कर जिंकणं ही भारतीय सिनेमासाठी खूप गर्वाची बाब आहे.
सोहळयात दीपिका पदुकोणने पुरस्कार सादर करत भारताचं प्रतिनिधित्व केलं.
ऑस्करच्या पुरस्कार सोहळ्यात यावेळी RRR च्या चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. रामचरण, ज्युनिअर एनटीआर आणि एस एस राजामौली देखील उपस्थित होते.
रामचरण, ज्युनिअर एनटीआर आणि एस एस राजामौली यांनी या पुरस्कार सोहळ्यात खास भारतीय पारंपरिक पेहराव करत सगळ्यांचंच लक्ष वेधलं.
राजामौली यांनी ऑस्करसाठी खास पांढरे धोतर व गुलाबी रंगाचा कुर्ता असा पारंपरिक पेहराव केला होता.
रामचरण याने खास कुर्ता आणि त्याची बायको उपासना हिने सुंदर पांढरी साडी नेसली होती.
ऑस्कर सोहळ्यातील या सगळ्या कलाकारांच्या खास लूकची आता चर्चा होत आहे.