दूरदर्शनवरील महाभारत सर्वांनी पाहिलं आहे. काळ पुढे सरकला भारतात ग्लोबलायझेशन झाल्यानंतरही महाभारत सारख्या मालिका तयार करण्यात आल्या. नव्या टेक्नलॉजीचा यात वापर करण्यात आला.
तुम्ही जर 2013चं महाभारत पाहिलं असेल तर महाभारतातील भीम तुम्हाला आठवत असेल. अभिनेता सौरव गुर्जर याने महाभारत या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.
सौरव आपल्या शरिरयष्टीमुळे भीम या पात्रासाठी एकदम फिट बसला होता. प्रेक्षकांनी त्याच्या भुमिकेला प्रचंड प्रेम दिलं.
प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या सौरवचं अभिनय हे पहिलं प्रेम नव्हतं. आता अभिनेता सौरव काय करतो हे ऐकून तुम्हालाही त्याचा अभिमान वाटेल.
सौरव गुर्जरचा कल हा पहिल्यापासून रेसलिंगकडे होता. त्या सुरूवातीपासूनच एक रेसलर व्हायचं होता. सध्या तो अभिनय क्षेत्रापासून दूर असून आपली पॅशन फॉलो करतोय.
कुस्तीच्या दुनियेत देखील त्यानं आपलं नाव कमावलं आहे. WWEच्या NXTमध्ये त्याला सांगा नावाने ओळखलं जातं.
कुस्तीच्या दुनियेत आपलं नाव कमावणाऱ्या सौरवचा लुक आता चांगलाच बदलला आहे. मोठे केस, दाढी, मिश्यांमुळे त्याला ओळखणं देखील कठीण झालं आहे.
सौरव सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असते. इन्स्टाग्रामवर त्याचे रेसलिंग रिंगचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो.
महाभारतनंतर सौरव काही थोट्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसला होता. त्यानंतर आता तो ब्रम्हास्त्र सिनेमात दिसला होता. या सिनेमात आलिया भट्ट, रणवीर कपूर आणि अमिताभ बच्चन सारख्या सुपरस्टार कलाकारांबरोबर त्यानं स्क्रिन शेअर केली होती.