NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / ना शाहरूख, ना रूपाली गांगुली, ना अमिताभ तर हा अभिनेता टीव्हीतून करतो 2200 कोटींची कमाई!

ना शाहरूख, ना रूपाली गांगुली, ना अमिताभ तर हा अभिनेता टीव्हीतून करतो 2200 कोटींची कमाई!

बॉलिवूडमधील हा लोकप्रिय अभिनेता त्या एका शोमुळे आज टीव्हीतून कमावतो इतके कोटी रूपये...कमाईत त्याने सलमान, अमिताभ बच्चन व शाहरूखला देखील मागे टाकले आहे.

15

भारतीय टेलिव्हिजनवर 'बुनियाद', 'रामायण', 'क्यूंकी सास भी कभी बहू थी', 'शक्तिमान', 'सीआयडी' आणि 'अनुपमा' असे अनेक सुपरहिट शो प्रसारित झाले आहेत, जे वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या आयुष्याचा भाग राहिले. पण काही वर्षांपूर्वी एक रिअॅलिटी शो प्रसारित झाला, ज्याने लोकांचे जीवन आणि विचारांना हादरवून टाकले. या शोच्या माध्यमातून बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खानने टीव्ही विश्वाला हादरवून सोडलं. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमिरनं केलं होतं.

25

'लगान', 'तारे जमीन पर', 'धूम', 'थ्री इडियट्स' यांसारख्या चित्रपटांमध्ये आमिर खानचे अनेक लूक तुम्ही पाहिले असतील. 'सत्यमेव जयते' या मालिकेतही त्याची एक वेगळी स्टाईल समोर आली. या शोनं लोकांच्या आयुष्याला खोलवर स्पर्श केला. आमिरचा हा कार्यक्रम पाहिल्यानंतर लोक रडले, हसले आणि काहींना आयुष्यात चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली. विशेष म्हणजे या शोमधून त्याला ऑल टाइम ब्लॉकबस्टर चित्रपट 'दंगल' बनवण्याची कल्पना सुचली.

35

आमिर खान 2014 मध्ये 'सत्यमेव जयते'चा तिसरा सीजन होस्ट करत होता, ज्याच्या एका एपिसोडमध्ये लोकांना दोन मुलींची ओळख झाली होती. या दोन मुलींनी अडचणींचा सामना करत कसा इतिहास रचला हे आमिरने सांगितले. त्यात कुस्तीपटू गीता फोगट आणि बबिता फोगट या दोन मुलींचा समावेश होता. आमिर खानचा 'दंगल' हा चित्रपट गीता आणि बबिता फोगट यांच्या जीवनावर आधारित आहे.

45

58 वर्षीय आमिर खानला शोदरम्यान गीता आणि बबिता यांच्याकडून ऐकलेल्या कथेवरून 'दंगल' चित्रपट बनवण्याची कल्पना सुचली. हा चित्रपट 2016 मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत ऑल टाइम ब्लॉकबस्टर ठरला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'दंगल' चित्रपटाने 11 दिवसांत 374.43 कोटी रुपयांची कमाई केली होती, जो स्वतःच एक विक्रम आहे, जो 7 वर्षांनंतर शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाने मोडला.

55

'दंगल' या चित्रपटाचे लाईफटाईम कलेक्शन 2207.3 कोटी रुपये आहे, जो भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. तर, आपण असे म्हणू शकतो की आमिर खानने टीव्हीमधून 2200 कोटी रुपये कमावले, कारण त्याला ब्लॉकबस्टर चित्रपट 'दंगल' बनवण्याची कल्पना अखेर 'सत्यमेव जयते' या टीव्ही शोमधून आली, आणि तोच या शोचा होस्ट होता.

  • FIRST PUBLISHED :