NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Neha Joshi : अभिनेत्री नेहा जोशीनं 'या' अभिनेत्याबरोबर गुपचूप उरकलं लग्न; फोटो आले समोर

Neha Joshi : अभिनेत्री नेहा जोशीनं 'या' अभिनेत्याबरोबर गुपचूप उरकलं लग्न; फोटो आले समोर

मराठी चित्रपटसृष्टीत एकामागे एक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. मोठ्या थाटामाटात कलाकारांचे विवाहसोहळे पार पडत आहेत. अशातच एका मराठी अभिनेत्रीनं मात्र गुपचूप लग्न केलं आहे. ही अभिनेत्री आहे नेहा जोशी.

19

नाटक, मालिका, सिनेमा या तिन्ही माध्यमांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री नेहा जोशी नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.

29

कोणताही गाजावाजा न करता नेहानं ओमकार कुलकर्णीसोबत लग्नगाठ बांधली.

39

नेहाने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत त्याला 'फायनली मॅरीड' असे कॅप्शन दिले आहे. सध्या या नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

49

नेहा जोशीचा पती ओंकार हा सुद्धा एक अभिनेता असून त्यासोबतच तो लेखक आणि कवी सुद्धा आहे.ओंकार यापूर्वी एका महाविद्यालयात इंग्रजीचा प्राध्यापकही होता.

59

एवढ्या खाजगीत लग्न करण्याबाबत नेहाने एका मुलाखतीत सांगितले कि त्या दोघांनाही कुठलाही गाजावाजा न करता फक्त कुटुंबियांसोबत लग्न करायचे होते.

69

नेहा आणि ओंकारची ओळख एका टीव्हीशो दरम्यान झाली होती. त्यानंतर या दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.

79

नेहा जोशी एक दमदार अभिनेत्री आहे. तिने मराठीसोबतच काही हिंदी मालिकांमध्ये देखील काम केलं आहे.

89

'का रे दुरावा' मालिकेतली रजनी असो, नाहीतर 'वाडा चिरेबंदी' नाटकातली चंचल 'रंजू', प्रत्येक भूमिकेचा सखोल अभ्यास करणारी, अतिशय सहज संवादफेकीचं कौशल्य असणारी अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे.

99

अभिनेत्री नेहा जोशीने 16 ऑगस्ट 2022 रोजी अचानक लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

  • FIRST PUBLISHED :