NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / ड्रग अॅडिक्ट अन् घटस्फोटित होता अभिनेता; अभिनेत्रीनं आईवडिलांच्या विरोधात जाऊन केलं आंतरधर्मीय लग्न

ड्रग अॅडिक्ट अन् घटस्फोटित होता अभिनेता; अभिनेत्रीनं आईवडिलांच्या विरोधात जाऊन केलं आंतरधर्मीय लग्न

Naseeruddin Shah Wife : बॉलिवूडमधील एका दिग्गज अभिनेत्रीला फिल्मी दुनियेत पाऊल ठेवण्यापूर्वीच तिच्या आयुष्यातील प्रेम भेटले होते. पण ज्या व्यक्तीच्या प्रेमात ती पडली होती तो ड्रग व्यसनी होता, त्याचा स्वभाव रागीट होता आणि तो घटस्फोटित होता. तिला घरच्यांनी त्याच्यासोबत लग्न न करण्यासाठी खूप समजावलं, पण ही अभिनेत्री प्रेमात इतकी वेडी झाली होती की तिने तिच्यापेक्षा वयानं मोठ्या अभिनेत्याशी आंतरधर्मीय लग्न केलं. ही लव्हस्टोरी आहे बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी नसिरुद्दीन शाह आणि अभिनेत्री रत्ना पाठक यांची.

18

नसिरुद्दीन शाह बॉलीवूडमधील जेष्ठ आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहेत, परंतु त्याच्या स्पष्ट विधानांमुळे ते नेहमीच अडचणीत येतात. पण त्यांना त्यांची पत्नी रत्ना पाठकचा नेहमीच पाठींबा मिळतो. नसीरुद्दीन शाह यांनी 'ह्युमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या लव्ह लाईफबद्दल खुलासा केला आहे.

28

नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक हे दोघे लग्नापूर्वी 7 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. याविषयी बोलताना ते म्हणाले की, 'आम्ही एकत्र राहत नव्हतो, पण एकमेकांवर प्रेम करत होतो. लग्नापूर्वी आम्ही 7 वर्षे रिलेशनशिपमध्ये होतो. पण तिचे आईवडील आमच्या लग्नाच्या विरोधात होते.'

38

याचं कारण सांगत ते म्हणाले की, 'कारण मला अंमली पदार्थांचं व्यसन होतं आणि माझे यापूर्वी एकदा लग्न झालं होतं. मी घटस्फोटित असण्यासोबत माझा स्वभाव देखील रागीट होता.'

48

नसीरुद्दीन पुढे म्हणतात, 'रत्नाला पहिल्यांदा पाहताच मी तिच्या प्रेमात पडलो होतो. आम्ही भेटलो तेव्हा ती सत्यदेव दुबे यांच्या नाटकात काम करत होती आणि मी एक चित्रपट केला होता. चांगल्या आणि वाईट काळात आम्ही एकमेकांना साथ दिली.'

58

नसीरुद्दीन आणि रत्ना यांचे नाते इतके घट्ट आहे कारण ते नेहमीच मित्र बनून राहिले. जवळपास 7 वर्षे डेटिंग केल्यानंतर रत्ना आणि नसीरुद्दीन यांनी 2 एप्रिल 1982 रोजी लग्न केले.

68

अभिनेत्याला त्याच्या पहिल्या लग्नापासून एक मुलगी आहे, तिचे नाव हिबा शाह आहे. नसीरुद्दीन यांना रत्ना पाठकपासून इमाद शाह आणि विवान शाह अशी दोन मुले आहेत, दोघेही अभिनेते आहेत.

78

72 वर्षीय नसीरुद्दीन शाह यांचा पहिला विवाह दिवंगत अभिनेत्री सुरेखा सिक्रीची बहिण मनारा सिक्रीशी झाला होता, जी त्यांच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठी होती. पण मतभेदांमुळे दोघे वेगळे झाले.'

88

नसीरुद्दीन आणि रत्ना पाठक या दोघांनी आज 40 वर्षांपेक्षा अधिक काळ एकमेकांसोबत घालवला असून दोघेही सुखी संसार करत आहेत.

  • FIRST PUBLISHED :