सनी देओल आणि अमिषा पटेल यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'गदर २' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
या चित्रपटाच्या रिलीजपूर्वी, एक महत्वाची माहिती मराठी दर्शकांसाठी समोर आली आहे. या चित्रपटात एक मराठमोळा अभिनेता महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
'गदर 2' या चित्रपटात नाना पाटेकर यांची एंट्री झाली आहे.
पण 'गदर 2' या चित्रपटात नाना पाटेकर अभिनय करताना दिसणार नाहीत. पण त्यांना ऐकण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
या चित्रपटात नाना पाटेकर आवाज देताना दिसणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, 'गदर 2'साठी नाना पाटेकर यांनी व्हॉईस ओव्हर केला आहे.
'गदर 2'साठी त्यांनी आवाज दिला आहे. चित्रपटाच्या सुरुवातीलाच नानांचा व्हॉईस ओव्हर प्रेक्षकांना 'गदर 2' ची ओळख करून देईल.
2001 मध्ये आलेल्या 'गदर' चित्रपटात ओम पुरी यांनी आपला आवाज दिला होता. आता ते या जगात नाहीत. आता त्यांच्या जागी नाना पाटेकर ही जबाबदारी निभावताना दिसणार आहेत.