मराठमोळा दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शिक सैराट या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कल्ला केला. अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर यांनी सिनेमात प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. ऑनर किलिंग हा सिनेमाचा विषय होता.
2016 मध्ये सैराट हा सिनेमा महाराष्ट्रात रिलीज झाला होता. सिनेमानं रिलीजनंतर 100 कोटींची कमाई केली. सिनेमाला अनेक नामांकित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.
हैराण करणारी बाब म्हणजे नागराज मंजुळे यांनी अवघ्या 4 कोटीच्या बजेटमध्ये हा सिनेमा बनवला. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर मात्र 110 कोटींची कमाई केली.
एक उच्च आणि एक खालच्या जातीचे मुलगा आणि मुलगी एकमेकांच्या प्रेमात पडतात. जातीय वादामुळे संघर्ष होतो आणि संघर्षाचा वेदनादायी शेवट सिनेमात दाखवण्यात आला होता.
सैराट या मराठी सिनेमानं 100 कोटींचा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. मागील 7 वर्षात सैराटचा रेकॉर्ड कोणताही मराठी सिनेमा मोडू शकला नाहीये. काही महिन्यांआधी अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया यांचा वेड हा सिनेमा रिलीज झाला होता. पण या सिनेमानं 75 कोटींचा बिझनेस केला.