कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमुळे लोक घरातच होते. त्यामुळं यावर्षी बहुतेक चित्रपट OTT वर प्रदर्शित झाले. यात असेही काही चित्रपट देखील होते, जे वादामुळे चर्चेत राहिले. तर काही चित्रपटांनी उत्तम स्टोरीमुळं प्रेक्षकांना प्रभावित केलं.
जय भीम : या तमिळ भाषेतील चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. तो संपूर्ण जगात गूगलवर सर्वाधिक शोधला गेला होता. साउथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार सुर्यानं या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.
शेर शाह : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेला 'शेर शाह' गूगलच्या सर्च लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा चित्रपट कारगिल युद्धाचे नायक कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित आहे.
राधे : सलमान खानचा हा राधे चित्रपट गुगलवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या चित्रपटांमध्ये तिसरा क्रमांकावर आहे.
बेल बॉटम : हा चित्रपट पहिल्यांदा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. मग तो OTT वर प्रदर्शित झाला. गूगल सर्च लिस्टमध्ये हा चित्रपट चौथ्या क्रमांकावर आहे.
इटर्नल्स : हा चित्रपट नोव्हेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झाला. हा हॉलिवूड चित्रपट या लिस्टमध्ये पाचव्या स्थानावर आहे.
मास्टर : हा चित्रपट 2021 च्या सुरूवातीला प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये दक्षिण सिनेमाचा स्टार विजय मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाला सहावं स्थान मिळालेलं आहे.
सूर्यवंशी : अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिकेत असलेला सूर्यवंशी हा चित्रपट गूगल सर्च लिस्टमध्ये सातव्या क्रमांकावर आहे.
Godzilla vs Kong : या चित्रपटाबाबत तरुणांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. लिस्टमध्ये हा चित्रपट आठव्या क्रमांकावर आहे.
दृश्यम 2 : दृश्यमच्या पहिल्या भागाच्या यशस्वीतेनंतर येणाऱ्या या चित्रपटाची खूप चर्चा झाली होती. गुगल सर्चमध्ये हा चित्रपट नवव्या स्थानावर आहे.
भुज द प्राइड ऑफ इंडिया : अजय देवगणच्या या देशभक्तीपर चित्रपटाला गूगल सर्च लिस्टमध्ये दहावं स्थान मिळालं आहे.