अभिनेता मिलिंद सोमण हे ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते आहेत. आपल्या दमदार अभिनयाने तो प्रेक्षकांची मने जिंकत असे. आज तो त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत असतो.
मिलिंदने आपल्यापेक्षा 26 वर्षांनी लहान असलेल्या अंकितासोबत लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले. आज दोघेही त्यांच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस साजरा करत आहेत.
मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर यांची पहिली भेट एका नाईट क्लबमध्ये झाली होती. मिलिंद पहिल्याच नजरेत अंकिताच्या प्रेमात पडला आणि अंकितालाही मिलिंद आवडू लागला.
त्यादरम्यान दोघांनाही एकमेकांबद्दल खूप काही कळलं आणि दोघांमध्ये बराच वेळ संवाद झाला, फोन नंबरची देवाणघेवाण झाली, त्यानंतर दोघेही खूप चांगले मित्र बनले.
दोघांची मैत्री अधिकच घट्ट होत गेली आणि ते सतत एकमेकांना भेटू लागले. त्यावेळी अंकिताचा आधीच एक बॉयफ्रेंड होता, पण त्याचा अचानक मृत्यू झाला, त्यामुळे अंकिता पूर्णपणे खचून गेली.
या दु:खाच्या काळात मिलिंदने अंकिताला साथ दिली आणि तिची काळजी घेताना तो स्वतः तिच्या प्रेमात पडला. यावेळी अंकिताही मिलिंदच्या खूप जवळ आली आणि त्यांचे प्रेम फुलले.
दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करू लागले आणि प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले. मिलिंद आणि अंकिता यांनी एकमेकांना पाच वर्षे डेट केले, त्यानंतर 2018 मध्ये त्यांनी लग्न केले.
अलिबाग येथे त्यांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत मराठी रितीरिवाजाप्रमाणे दोघांनी लग्न केले. मिलिंद आपल्यापेक्षा 26 वर्षांनी लहान मुलीशी लग्न केल्यामुळे प्रसिद्धीझोतात आला होता.
वयात इतकं मोठं अंतर असूनही दोघांच्या प्रेमात कुठेही कमतरता नव्हती. आज दोघेही त्यांच्या आयुष्यात एकमेकांसोबत खूप आनंदी दिसतात आणि अनेकदा कपल गोल देतात.