NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / MET Gala 2023 साठी 4 दिवस लेकीपासून दूर राहिली आलिया; इमोशनल होत म्हणाली 'उठताच तिला मी...'

MET Gala 2023 साठी 4 दिवस लेकीपासून दूर राहिली आलिया; इमोशनल होत म्हणाली 'उठताच तिला मी...'

आलिया भट्टने अलीकडेच MET Gala या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचं प्रतिनिधित्व केलं. सहा महिन्यांपूर्वी आई झालेल्या आलियाच्या या लूकचं सर्वानी खूपच कौतुक केलं. पण अवघ्या ६ महिन्यांपूर्वी आई झालेल्या आलियाला या सोहळ्यासाठी पूर्ण चार दिवस लेकीपासून दूर राहावं लागलं. याविषयी नुकत्याच तिने भावना व्यक्त केल्या आहेत.

18

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही नुकतीच आई झाली असून ती सध्या मुलगी, कुटुंब आणि काम सांभाळत आहे. याच कारणामुळे आलियाही सतत तणावात असते.

28

आलिया भट्टने अलीकडेच MET Gala या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचं प्रतिनिधित्व केलं. सहा महिन्यांपूर्वी आई झालेल्या आलियाच्या या लूकचं सर्वानी खूपच कौतुक केलं.

38

आलियाने मेट गालामध्ये डेब्यू केला आहे. तिच्या आऊटफिट्नने सर्वांचं लक्ष वेधलं. .

48

आलियाला आपण काम आणि मुलगी दोन्ही व्यवस्थित सांभाळतोय याची काळजी तिला सतावत राहते.

58

अवघ्या 6 महिन्यांपूर्वी आई झालेल्या आलियाला MET Gala या सोहळ्यासाठी पूर्ण चार दिवस लेकीपासून दूर राहावं लागलं. याविषयी नुकत्याच तिने भावना व्यक्त केल्या आहेत.

68

आलियाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये ती या सोहळ्यासाठी तयार होत असताना राहा विषयी बोलताना दिसतेय.

78

आलिया म्हणाली कि, “मी माझ्या मुलीपासून, राहा पासून लांब राहिले आहे. तिला या जगात येऊन आता जवळपास 6 महिने झाले आहेत. पण मी याआधी तिच्यापासून फक्त 24 तासांपेक्षा अधिक काळ दूर राहिले नाहीये.'

88

आता या सोहळ्यासाठी, 'एक दिवस नाही तर तब्बल 4 दिवस मी दूर राहणार आहे. मला जास्त वेळ मिळत नाही, पण मी उठताच तिला कॉल करते.' अशा भावना तिने व्यक्त केल्या आहेत.

  • FIRST PUBLISHED :