नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना ही दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
इंडस्ट्रीतील सुपरहिट आणि टॉप अभिनेत्रींमध्ये तिचे नाव येते. तिने पुष्पा, गीता गोविंदम आणि डिअर कॉम्रेड सारखे चित्रपट दिले आहेत. पण अभिनेत्रीने तिच्या करिअरमध्ये असे अनेक मोठे सिनेमे रिजेक्ट केले आहेत जे नंतर सुपरहिट झाले.
लोकेश कंग्रज दिग्दर्शित 'मास्टर'मध्ये विजयने मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला आणि ब्लॉकबस्टर ठरला. रश्मिकाने 'मास्टर' नाकारला कारण ती त्यावेळी इतर प्रोजेक्टमध्ये व्यस्त होती. नंतर या चित्रपटात मालविका मोहननने मुख्य अभिनेत्रीची भूमिका केली होती.
'जर्सी' हा एक हिंदी चित्रपट असून त्यात शाहिद कपूर मुख्य भूमिकेत आहे आणि तो तेलगू चित्रपटाचा रिमेक होता. हा चित्रपट रश्मिकालाही ऑफर करण्यात आला होता, पण तिने काही कारणांमुळे तो नाकारला होता. नंतर रश्मिका मंदान्नाच्या जागी मृणाल ठाकूरने भूमिका साकारली.
'किरिक पार्टी' या चित्रपटातून रश्मिकाने कन्नडमध्ये पदार्पण केले. आता तो हिंदीत देखील बनवला जात आहे. रश्मिकाने हिंदीमध्ये भूमिका स्वीकारली नाही. याचं कारण त्या भूमिकेत काही नावीन्य नाही असं तिने दिलं.
संजय लीला भन्साळी यांनी एका चित्रपटासाठी रश्मिका मंदान्नाला एका चित्रपटासाठी संपर्क साधला होता, पण नंतर अज्ञात कारणांमुळे तिने हा प्रोजेक्ट नाकारला. या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून रणदीप हुडाची निवड करण्यात आली होती.
रामचरणचा शंकर दिग्दर्शित आगामी 'RC 15' चित्रपटासाठी रश्मिकाला संपर्क करण्यात आला होता. रिपोर्ट्सनुसार, नंतर ही भूमिका कियारा अडवाणीला ऑफर करण्यात आली.