बॉलिवूडची प्रसिद्ध डिझायनर मसाबा गुप्ताचा माजी पती मधु मंटेनाने आपल्या आयुष्यात एका नव्या अध्याय सुरु केला आहे. मधुने इरा त्रिवेदीसोबत 48 व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे.
निर्माते मधु मंटेना आणि इरा त्रिवेदी यांचे लग्न सध्या मनोरंजन विश्वात चर्चेचा विषय आहे. मधू आणि इरा यांनी लग्नानंतर रिसेप्शन आयोजित केले होते, ज्यामध्ये फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
मसाबापासून वेगळे झाल्यानंतर मुध इराच्या संपर्कात आला. दोघेही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होते पण दोघांना लग्नाचा निर्णय घ्यायला वेळ लागला.
लग्नाचे काही खास फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करत इराने लिहिले की, 'मी आता पूर्ण झाली आहे'.
लग्नामध्ये दोघांनीही पारंपरिक वेष केला होता. इरा गुलाबी कांजीवरम साडीमध्ये अत्यंत सुंदर दिसत होती, तर मधूने पारंपारिक धोती आणि कुर्ता परिधान केला होता.
मधू मंटेना हा बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता आहे तर त्यांची दुसरी पत्नी इरा प्रसिद्ध योगतज्ञ आहे.
खास कपलच्या रिसेप्शनला आमिर खान, सोनाक्षी सिन्हा, हृतिक रोशन, अल्लू अर्जुन, जॅकी श्रॉफ, हुमा कुरेशी, अनिल कपूर, अनुपम खेर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
आमिर खान आणि मधु चांगले मित्र आहेत, अशा परिस्थितीत आमिर खास लग्नाला पोहोचला. त्याचवेळी पार्टीदरम्यान हृतिक आणि साऊथ स्टार अल्लूची भेट सोशल मीडियावर चर्चेचा मुद्दा ठरली.
मधू मंटेना आणि इराला चाहते वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा देत आहेत.