टेलिव्हिजनवर नव्या मालिका येऊ घातल्या आहेत. पण जुन्या मालिका काही त्यांची जागा सोडायला तयार नाहीत. अशातच मागील काही महिन्यांपासू एक नायिका अरुंधती आणि दीपावर सातत्यानं वरचढ ठरतेय. या आठवड्याचं टीआरपी रेटिंग समोर आलंय.
तुझेच मी गीत गात आहे ही मालिका 6.1 रोटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहे. मालिकेत सध्या अभिनेत्री उर्मिला कोठारे आणि तेजस्विनी लोणारी यांची एंट्री झाली आहे.
तर सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका चौथ्या क्रमांकावर असून मालिकेला 6.4 इतकं रेटिंग मिळालं आहे.
त्यानंतर अनेक महिने टॉप 1वर असलेली दीपा मात्र आता तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. रंग माझा वेगळा ही मालिका 6.6 रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
तर आई कुठे काय करते या मालिकेला देखील तगडी टक्कर मिळाली आहे. अरुंधतीची मालिका 6.7 रोटिंगस दुसऱ्या क्रमांकावर आहे.
तर टेलिव्हिजनवरील ही दोन प्रसिद्ध मालिकांना मागे टाकून ठरलं तर मग ही मालिका गेली अनेक आठवडे पहिल्या क्रमांकावर आहे. अभिनेत्री जुई गडकरीने अनेक वर्षांनी या मालिकेतून कमबॅक केलं आहे. मालिका 6.9 रोटिंगसह पहिल्या क्रमांकावर आहे.