स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी मालिकेत बाप्पाचं अगदी जल्लोषात स्वागत होणार आहे. कानेटकर कुटुंब पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून बाप्पाचा आगमन करणार आहेत.
कानेटकर कुटुंबात यंदा बाप्पाच्या उत्सवासाठी पर्यावरणपुरक मुर्ती असणार आहे.
त्याचप्रमाणे बाप्पाचा देखावाही घरातल्याच वस्तूंपासून बनवण्यात आला आहे.
अप्पू, शशांक आणि कुक्की गँगने एकत्र येऊन टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचा वापर करत बाप्पाच्या सजावटीसाठी वाड्याचीच प्रतिकृती तयार केली आहे.
कानेटकर कुटुंबात सुग्रास नैवेद्याची रेलचेल असणार आहे. सगळी महिला गॅंग बाप्पाला गोडधोड पदार्थांचा नैवेद्य दाखवणार आहेत.
सोबतच कानिटकरांच्या घरात भजनाचा खास कार्यक्रम देखील रंगणार आहे.
संपूर्ण कुटुंबाने एकत्र येत सण साजरे करण्यात खरा आनंद दडलेला असतो. ठिपक्यांची रांगोळी ही मालिका आणि यातील प्रत्येक पात्र म्हणूनच प्रेक्षकांच्या कुटुंबाचा महत्त्वाचा भाग बनली आहे.
अप्पू आणि शशांक यांच्या नात्यातला गोडवा देखील या गणेशोत्सवामुळे आणखी वाढणार आहे.