NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Independence day 2022: मराठी कलाकारांचा अमेरिकेत डंका; कार्यक्रमाला 'या' कलाकारांची उपस्थिती

Independence day 2022: मराठी कलाकारांचा अमेरिकेत डंका; कार्यक्रमाला 'या' कलाकारांची उपस्थिती

मराठी कलाकारांनी अमेरिकेत एकदम आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा केल्याचं बघायला मिळालं आहे. अनेक आघाडीचे कलाकार यावेळी उपस्थित होते.

110

मराठी कलाकारांचा डंका सध्या अमेरिकेत वाजताना दिसत आहे. अटलांटा सिटीमध्ये बृहन महाराष्ट्र मंडळाच्या झालेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावत आपला कलाविष्कार सादर केला.

210

हेमांगी कवीने आज शेअर केलेल्या फोटोमध्ये ती नऊवारी साडीच्या पोशाखात दिसत आहे. हेमांगी सुद्धा या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाली होती.

310

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सुद्धा अमेरिकेत झालेल्या या मराठमोळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिली होती. यावेळी सोनालीने तिरंग्याच्या रंगाची सुंदर साडी परिधान करून काही फोटो शेअर केले.

410

या कार्यक्रमात लीना भागवत यांच्या आमने-सामने नाटकाचा प्रयोगसुद्धा रंगला. अमेरिकेत लीना आणि मंगेश या कपलने सुंदर फोटो सुद्धा शेअर केला. या नाटकाच्या प्रयोगानंतर लीना भावुक झाल्याचं दिसून आलं.

510

हेमांगीने अमेरिकेत जमलेल्या सगळ्या कलाकारांचा एक फोटोसुद्धा शेअर केला होता. यामध्ये पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, समीर चौगुले, विशाखा सुभेदार, मृण्मयी देशपांडे, सावनी रवींद्र अशा अनेक कलाकारांचा समावेश होता.

610

चंद्रमुखी सिनेमात नृत्यदिग्दर्शिका म्हणून ज्यांनी काम पाहिलं अशा दिली विचारे सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

710

या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण होतं शंकर महादेवन यांचं गाणं. त्यांच्या मधुर आवाजाने त्यांनी माहोल तयार केल्याचं बघायला मिळालं. सौजन्य- झी ग्लोबल

810

या कार्यक्रमामध्ये मृण्मयी देशपांडे सुद्धा नृत्याविष्कार सादर करताना दिसली.

910

तसंच मृणाल कुलकर्णी आणि अक्षय बर्दापूरकर सुद्धा अमेरिकेत या कार्यक्रमाला उपस्थित होते.

1010

या सगळ्या कलाकारांनी मिळून अमेरिकेत असणाऱ्या मराठी बांधवांसोबत भारतीय असण्याची भावना जागृत ठेवत स्वातंत्र्यदिनाच्या आधी खूप मोठं सेलिब्रेशन केल्याचं बघायला मिळालं.

  • FIRST PUBLISHED :