NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Rakshabandhan 2022: मराठीतील 'या' आघाडीच्या अभिनेत्रींना नाहीये भाऊ; पण बहिणींची जोडी आहे लई भारी

Rakshabandhan 2022: मराठीतील 'या' आघाडीच्या अभिनेत्रींना नाहीये भाऊ; पण बहिणींची जोडी आहे लई भारी

मराठीच्या काही आघाडीच्या अभिनेत्री आणि त्यांच्या या सख्ख्या बहिणींची जोडी तुम्हाला माहित आहे का?

19

रक्षाबंधन म्हणजे भावा-बहिणीच्या नात्याचा दिवस. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते हे तर सगळ्यांना माहित आहेच. पण सध्या फक्त भावाला राखी बांधण्याऐवजी बहिणीला सुद्धा राखी बांधून या नात्याचा गोडवा साजरा केला जातो. मराठी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा अशा काही आघडीच्या अभिनेत्री आहेत ज्यांना भाऊ तर नाहीये पण त्यांचं बहिणीशी एक स्ट्रॉंग नातं आहे.

29

मराठीमध्ये या दोन देशपांडे सिस्टर्स नेहमीच धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघींचे व्हिडिओ सुद्धा चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. दोघीही एकमेकींना त्रास देण्याची एकही संधी सोडत नाहीत पण दोघींचं एकमेकींवर प्रेमसुद्धा तितकंच आहे. दोघीही उत्तम अभिनेत्री असून त्यांचा चाहतावर्ग सुद्धा मोठा आहे.

39

अभिनेत्री प्रिया बापटची बहीण आहे श्वेता. श्वेता ही फॅशन आणि स्टायलिंग क्षेत्रात काम करत असून तिचा स्वतःचा ब्रँड आहे. प्रिया आणि श्वेता यांचं नातं एकदम घट्ट असून दोघी एकत्र वेळ घालवताना दिसत असतात.

49

अभिनेत्री अमृता खानविलकरला सुद्धा सख्खी बहीण असून तिचं नाव अदिती असं आहे. अदितीला दोन मुलं असून अमृता नेहमीच त्यांच्याबद्दलचे अपडेट्स शेअर करत असते. अदिती आणि अमृतामध्ये खूप प्रेम असल्याचं सुद्धा दिसून आलं आहे.

59

अभिनेत्री स्पृहा जोशीला सुद्धा क्षिप्रा नावाची सख्खी बहीण आहे. स्पृहाची बहीण क्षिप्रा ही स्पोर्ट क्षेत्रात कार्यरत आहे. दोघींचा हा जुना फोटो बघून त्यांच्या चेहऱ्यात भलतंच साम्य दिसत आहे.

69

फोटोमध्ये दिसणारी ही चिमुकली म्हणजे अभिनेत्री श्रुती मराठी. या अभिनेत्रीला सुद्धा सख्खी बहीण असून तिचं नाव प्रीती आहे. त्यांचा हा लहानपणीचा क्युट फोटो चाहत्यांना खूप पसंत पडला आहे.

79

सध्या माझी तुझी रेशीमगाठ मध्ये दिसणारी नेहा म्हणजे अभिनेत्री प्रार्थना बेहरेला सुद्धा सख्खी बहीण आहे. तिचं नाव गायत्री असून दोघींचा एक क्युट व्हिडिओ सुद्धा प्रार्थनाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

89

अभिनेत्री भार्गवी चिरमुलेची बहीण सुद्धा अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. तिचं नाव आहे चैत्राली गुप्ते. भार्गवी आणि चैत्राली सख्ख्या बहिणी असून त्या दोघी एकमेकींना राखी बांधतात हे एका फोटोमध्ये दिसून आलं आहे.

99

मराठीतील आणखीन दोन सख्ख्या अभिनेत्रीची ही जोडी आहे खुशबू आणि तितिक्षा तावडे यांची. दोघीही मालिका क्षेत्रात आपलं वेगळं नाव कमवून आता नव्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसून येत असतात. सध्या तितिक्षा नव्याने मावशी झाली आहे. खुशबूचा मुलगा राघवसह या दोन बहिणी मस्त वेळ घालवताना दिसत असतात.

  • FIRST PUBLISHED :