अनेकवर्ष मालिका आणि सिनेमा क्षेत्रात चांगलं नाव कमावलेली एक अभिनेत्री म्हणजे तेजा देवकर.
तेजा हिने हिरवं कुंकू, ऑक्सिजन असे हिट सिनेमे तर कुलस्वामिनी नावाची हिट मालिका केली आहे.
पण सध्या ही अभिनेत्री गेली अनेकवर्ष सिनेसृष्टीपासून लांब आहे.
गेल्या जवळपास 7-8 वर्षात तिचा कोणताच नवा प्रोजेक्ट आलेला नाही.
पण या अभिनेत्रीच फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. तसंच तेजा नेहमीच वेगवेगळे फोटोशूट करताना दिसत असते.
सध्या या अभिनेत्रीने बंगाली वेशात केलेलं फोटोशूट खूपच गाजताना दिसत आहे. यामध्ये तेजा एक बंगाली ब्युटी दिसत आहे.
याशिवाय तेजाने अनेक वेगवेगळ्या लुकमध्ये याआधीही फोटोशूट केलं आहे.
याआधी तिने भरजरी घागरा आणि ज्वेलरीमध्ये केलेलं फोटोशूट बरंच गाजलं होतं.