NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Prajakta Mali: साडीवर बेल्ट लावायची गरजच काय? तुमच्या लाडक्या प्राजक्ताला पडलाय प्रश्न

Prajakta Mali: साडीवर बेल्ट लावायची गरजच काय? तुमच्या लाडक्या प्राजक्ताला पडलाय प्रश्न

अभिनेत्री प्राजक्ता माळीनं तिचे नवे फोटो शेअर करत साड्यांच्या बदलत्या ट्रेंड प्रश्न उपस्थित केला आहे. पाहा प्राजक्ताचे नवे फोटो.

110

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. प्राजक्ता आता महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये ही परत आली आहे.

210

हास्यजत्रा सुरू झाल्यानं प्राजक्ताचं फोटोशूट मोड देखील ऑन झालं आहे.

310

प्राजक्ताला आजवर आपण अनेक लुकमध्ये पाहिलं आहे. तिच्या एकाहून एक सुंदर सुंदर साड्यांची भुरळ प्राजू नेहमीच तिच्या प्रेक्षकांवर घालत असते.

410

पैठणी, बनारसी, स्टायलिश साड्यांपासून आजवर सगळ्या साड्या प्राजक्तानं नेसल्या आहेत. प्राजक्ताला प्युअर कॉटनच्या साड्या विशेष आवडतात.

510

काळ बदलतोय तसा साड्या नेसण्याची पद्धतही बदलत चालली आहे. प्राजक्ता अगदी पारंपरिक ते स्टायलिश अशा सगळ्याचं लुकमध्ये फिट बसते. नवीन नवीन लुक्सही ती नेहमी ट्राय करत असते.

610

हल्ली साड्यांवर पट्टा लावण्याची स्टाइल आली आहे. अगदी कॉटनच्या साड्यांपासून सिल्क, शिफॉन सगळ्या साड्यांवर पट्टा लावून एक हटके लुक आणण्याचा प्रयत्न केला जातो.

710

अभिनेत्री प्राजक्ता माळीनं देखील साडीवर पट्टा लावून स्टायलिश लुकमध्ये फोटोशूट केलंय. मात्र साड्यांवर पट्टा लावण्याचा हा नवा प्रकार प्राजक्ताच्या काही पसंतीस उतरलेला दिसत नाही. प्राजूनं साडीवर बेल्ट लावायची गरजच काय? असा प्रश्न केला आहे.

810

या प्रश्नाचं उत्तर देत प्राजक्तानं म्हटलंय, कधी कशाची fashion होईल सांगतां येत नाही. त्यामुळे मग काहीही असो, हसत आनंदानं ते दाखवा आणि पुढे जा.

910

प्राजक्ताच्या या फोटोंवरही तिच्या लाडक्या चाहत्यांनी भरभरुन प्रेमाचा वर्षाव केला आहे.

1010

फॅशन ट्रेंड येतात जातात पण स्वॅग आणि एटीट्युड कायम राहतो, असं म्हणतं चाहत्यांची प्राजक्ताचं कौतुक केलं आहे.

  • FIRST PUBLISHED :