महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या अभिनयामुळे चर्चेत आहे.
दिवाळीनिमित्त दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील दीपोत्सव आणि त्यानंतर प्राजक्तासह अनेक मराठी कलाकारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट दिली.
राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर प्राजक्ता माळी राजकारणात प्रवेश करणार असल्याचा चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या.
या चर्चा सुरू असतानाच प्राजक्तानं थेट मुंबईहून पुण्याना प्रस्थान केलं आहे. प्राजक्ताच्या पुण्याला तिच्या घरी दिवाळी साजरी करण्यासाठी गेली आहे.
अनेक दिवस सिनेमा आणि कार्यक्रमाच्या शुटींगमुळे प्राजक्ता घरापासून दूर आहे. दिवाळीच्या निमित्तानं प्राजक्तानं घरच्यांची भेट घेत कुटुंबासमवेत दिवाळी साजरी केलीय.
आई-वडील, भाऊ-वहिनी आणि प्राजक्ताच्या दोन्ही लाडक्या भाच्यांबरोबरचे फोटो प्राजक्तानं शेअर केले आहेत.
प्राजक्ता तिच्या लाडक्या भावाबरोबर उद्याची भाऊबीज साजरी करणार आहे.
इतकंच नाही तर लाडक्या भाच्यांबरोबर प्राजक्ता मनसोक्त दिवाळी साजरी करत असून खूप धम्माल मजामस्ती करतेय. प्राजक्ताच्या फोटोंना सध्या सोशळ मीडियावर चाहत्यांची पसंती मिळत आहे.