हेमांगी मुळची मुंबईची आहे. तिचं संपूर्ण मुंबईत झालं. मुंबईच्या सर जे. जे. स्कुल ऑफ आर्ट्स मधून तिनं शिक्षण घेतलं आहे.
अभिनेत्री असलेली हेमांगी चित्रकला विषयात देखील चांगलीच पारंगत आहे. नुकतीच तिनं जे. जे. स्कुल्स ऑफ आर्ट्सला भेट दिली. तिथे सुरू असलेल्या आर्ट एक्झिबिशनलाही भेट दिली.
कॉलेजमध्ये जाताच तिच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. जे. जे. स्कुल ऑफ आर्ट्सची वास्तू फार जुनी असून मुंबईतील प्रसिद्ध हेरिटेज आहे.
कॉलेजमध्ये जाताच हेमांगीनं प्रत्येक कोपऱ्यात, आवडत्या जागी फोटो काढून ते पोस्ट केलेत. त्यासह छान पोस्ट देखील लिहिली आहे.
"सर ज. जी. कला महाविद्यालय माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आणि महत्वाचा टर्निंग पॉइंट म्हणजे माझं कॉलेज!", असं हेमांगीनं म्हटलं आहे.
"सर ज. जी. कला महाविद्यालय माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आणि महत्वाचा टर्निंग पॉइंट म्हणजे माझं कॉलेज!", असं हेमांगीनं म्हटलं आहे.