NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Amruta Khanvilkar Chanramukhi: चंद्राचा नवीन प्रवास सुरू; चंद्रमुखी 2 प्रेक्षकांच्या भेटीला?

Amruta Khanvilkar Chanramukhi: चंद्राचा नवीन प्रवास सुरू; चंद्रमुखी 2 प्रेक्षकांच्या भेटीला?

अभिनेत्री अमृता खानविलकरनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चंद्रमुखीचा नवा प्रवास सुरू झाला असं म्हटलं आहे. चंद्रमुखी 2 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे का? जाणून घ्या.

110

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनं चंद्रमुखी या सिनेमातून संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं.

210

विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी या कांदबरीवरील आधारित चंद्रमुखी हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतील उतरला.

310

अभिनेता प्रसाद ओकनं सिनेमाचं दमदार दिग्दर्शन करत चंद्रमुखी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली.

410

अभिनेत्री अमृता खानविलकरनं चंद्रमुखी हे प्रमुख पात्र उत्तमरित्या साकारलं. त्याचप्रमाणे सिनेमात अभिनेता आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, समीर चौघुले यांनीही सिनेमात प्रमुख भूमिका केल्या आहेत.

510

सिनेमानं बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत नवा रेकॉर्ड बनवला. मुंबईसह महाराष्ट्रातच नव्हे तर देशाबाहेरही चंद्रमुखी सिनेमाचे शो हाऊसफुल्ल झाले.

610

अभिनेता प्रसाद ओकच्या आयुष्यातील चंद्रमुखी हा सिनेमा फार महत्त्वाचा ठरला. सिनेमासाठी प्रसादनं विशेष मेहनत घेतली होती.

710

सिनेमाची सुंदर कथा, त्याचप्रमाणे सिनेमाचे संवाद, गुरू ठाकूर यांनी लिहिलेली सुंदर गाणी आणि त्याला संगीतकार अजय अतुल यांचं मिळालेलं सर्वोत्तम संगीतानं सिनेमा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला.

810

सिनेमातील चंद्रा या गाण्यानं नवा रेकॉर्ड तयार केला. आजही सोशल मीडियावर चंद्रा या गाण्याची प्रेक्षकांना भुरळ आहे.

910

प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या चंद्राचा आता नवा प्रवास सुरू झाला आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

1010

चंद्राचा नवा प्रवास सुरू झालाय तो म्हणजे नामांकनाचा. अनेक पुरस्कारांसाठी चंद्रमुखी सिनेमाला नामांकन मिळालं आहे. सिनेमाला मिळालेल्या नामांकनामुळे कलाकार आणि सिनेमाची संपूर्ण टीम भरपूर आनंदी आहे.

  • FIRST PUBLISHED :