'अबोल प्रीतीची अजब कहाणी' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या मालिकेत अभिनेता अजिंक्य राऊत आणि जान्हवी तांबट मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
पण या मालिकेच्या शुटिंगदरम्यान अजिंक्यची तब्येत अचानक खालवली असून तो सेटवरच उपचार घेत आहे.
अजिंक्यला पाठीचा त्रास होत असल्याने त्यावर उपचार करत तो 'शो मस्ट गो ऑन' म्हणत मालिकेचं शूटिंग करत आहे.
मालिकेचे चित्रकरण सुरु असताना अजिंक्यची तब्बेत थोडी खालावली. पण प्रेक्षकांसाठी नवी मालिका घेऊन येण्याच्या उत्सहात तोच ते सगळं विसरलाय.
'अबोल प्रीतीची अजब कहाणी' या मालिकेच्या सेटवरच अजिंक्य डॉक्टरांना बोलावून तिथेच उपचार करत आहे.
त्याच्या चाहत्यांना त्याची फार काळजी असून सोशल मीडियावर त्यांनी त्यांचे अजिंक्यावरील प्रेम व्यक्त केले.
अजिंक्यची तब्बेत लवकरात लवकर ठीक व्हावी यासाठी ते त्याला सदिच्छा देत आहेत
अजिंक्यने देखील त्याच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावरविशेष पोस्ट करून तो कशी स्वतःची काळजी घेतो आहे याबद्दल माहिती दिली आहे.