NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / पत्रिका छापल्या, तिकडं नवरीही झाली होती तयार पण मुलीच्या भावानं घातला खोडा, 'त्या' एका कारणामुळं मनोज मुंतशिरचं मोडलं लग्न

पत्रिका छापल्या, तिकडं नवरीही झाली होती तयार पण मुलीच्या भावानं घातला खोडा, 'त्या' एका कारणामुळं मनोज मुंतशिरचं मोडलं लग्न

'आदिपुरुष' मुळे चर्चेत असलेले मनोज मुंतशिर यांच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल क्वचितच कोणाला माहिती असेल.

16

'आदिपुरुष' मुळे चर्चेत असलेले मनोज मुंतशिर यांच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल क्वचितच कोणाला माहिती असेल. तुम्हाला माहिती आहे का की, लेखनाच्या व्यवसायामुळे त्यांचे पहिले लग्न मोडले होते. त्यांच्या लग्नाची पत्रिकाही छापण्यात आली होती.

26

एकदा मनोज मुंतशिर 'द कपिल शर्मा शो' मध्ये पाहुणे म्हणून आले होते, तेव्हा त्यांनी त्यांच्या लव्ह लाईफ आणि त्याच्या लेखन व्यवसायामुळे लग्न मोडल्याचे सांगितले होते.

36

मनोज यांनी कपिलच्या शोमध्ये सांगितले होते, "13 मे 1997 रोजी त्यांचे लग्न होणार होते. कार्डही छापून आले होते. लग्नाच्या एक महिना आधी म्हणजेच एप्रिलमध्ये त्या मुलीचा भाऊ मला भेटायला आला होता."

46

मनोज मुंतशीर म्हणाले, "मुलीच्या भावाने मला माझ्या करिअर प्लॅनिंगबद्दल विचारले. मी म्हणालो की मला गीतकार व्हायचे आहे. तो म्हणाला - चांगली गोष्ट आहे, पण तू तुझ्या करिअरमध्ये काय करणार?"

56

मनोज यावेळी म्हणले, मी पूर्णवेळ गीतकार बनणार आहे. तो घरी गेला आणि मग लग्न मोडल्याची बातमी मिळाली. मला वाईट वाटले. मी त्या मुलीच्या प्रेमात होतो. पण प्रेम आणि लेखन यातला पर्याय होता. मी निवड केली. लेखन." (छायाचित्र सौजन्यः इंस्टाग्राम)

66

हे लग्न मोडल्यानंतर मनोज मुंतशीर यांनी ठरवले की, कोणावर तरी प्रेम केल्यानंतरच लग्न करायचे. त्यानंतर त्याने नीलमशी लग्न केले. नीलम या लेखिकाही आहेत. नीलम आणि मनोज यांना आरु शुक्ला नावाचा मुलगा आहे. (छायाचित्र सौजन्यः इंस्टाग्राम)

  • FIRST PUBLISHED :