मनोज बाजपेयी हे बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांना फॅमिली मॅन म्हणून ओळखलं जातं.
मनोज बाजपेयीचं तरुणांमध्ये जबरदस्त चाहतावर्ग आहे. याचं कारण त्यांचा दमदार अभिनय हे आहेच पण त्यासोबतच त्यांचा फिटनेस हे देखील आहे.
मनोज बाजपेयी आज 54 वर्षांचे असले तरी त्यांचा लूक एखाद्या तरुण अभिनेत्याला लाजवेल असाच आहे.
या अभिनेत्याला त्याच्या फिटनेसचं गुपित विचारला असता त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.
नुकतंच एका मुलाखतीत मनोज यांनी 14 वर्षांपासून रात्रीचं जेवण केलं नसल्याचा खुलासा केला आहे.
यामागचं कारण विचारल्यावर त्यांनी सांगितलं कि, 'माझे आजोबा त्यांच्या उतारवयातही खूपच फिट दिसायचे. मला पण त्यांच्यासारखा फिटनेस हवा होता. मी त्यांना फॉलो करायला सुरुवात केली.'
ते पुढे म्हणाले, 'हे करताना मी हळूहळू रात्रीचं जेवण सोडून दिलं. त्यानंतर माझं वजन आटोक्यात यायला लागलं. आणि मला स्वतःला मी आरोग्यदायी आणि उत्साही असल्याचं जाणवत होतं.'
मनोज पुढे म्हणाले, 'आज 13 ते 14 वर्ष झाले मी रात्रीचं जेवण पूर्णपणे बंद केलं आहे. मी काहीच खात नाही. आता येणाऱ्या काळात मी ज्या प्रोजेक्ट वर काम करणार आहे त्यासाठी मला हेच वजन कायम ठेवायचं आहे.' असा खुलासा त्यांनी केला आहे.