बॉलिवूड सेलिब्रेटींची दिवाळी सुरू झालीये. एकामागून एक दिवाळीच्या पार्ट्यांनाही सुरूवात झाली आहे.
बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्रानं सेलेब्ससाठी ग्रँड पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला बॉलिवूडचे मोठे कलाकार पोहोचले होते.
सारा अली खान, जान्हवी कपूर कतरिना पासून धकधक गर्ल माधुरी दीक्षित ऐश्वर्या राय बच्चन, काजोल यांनी हजेरी लावली होती.
मनीष मल्होत्राच्या ग्रँड दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिनेता विक्की कौशल आणि कतरिना लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी करत आहेत. मागच्या वर्षी दोघांचं लग्न झालं होतं.
अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनीही मनीष मल्होत्राच्या पार्टीला हजेरी लावली होती.
धकधक गर्ल माधुरी दीक्षित पती श्रीराम नेनेंबरोबर पार्टीला पोहोचली होती. माधुरी आणि श्रीराम नेने यांना अनेक दिवसांनी एकत्र स्पॉट करण्यात आलं.
तर अभिनेत्री रवीना टंडणला खूप दिवसांनी स्पॉट करण्यात आलं.
अभिनेत्री मलायका अरोरानं दिवाळी पार्टीसाठी ब्लॅक आऊटफिट कॅरी केला होता.
सारा अली खाननं देखील पार्टीसाठी स्पेशल लेहंगा घेतला होता.
ब्युटीक्विन ऐश्वर्या रायनं तर तिच्या लुकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय करिश्मा कपूर या नव्वदच्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्री देखील एकत्र दिसल्या.