NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Manasi Naik Divorce: घटस्फोटानंतर मानसी नाईकचे पतीवर गंभीर आरोप; म्हणाली 'त्याने फक्त पैशांसाठी...'

Manasi Naik Divorce: घटस्फोटानंतर मानसी नाईकचे पतीवर गंभीर आरोप; म्हणाली 'त्याने फक्त पैशांसाठी...'

मानसी नाईकने नवरा प्रदीपबरोबर घटस्फोट घेत असल्याचं नुकतंच तिनं सांगितलं.आता तिने एका मुलाखतीत पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेण्याचं खरं कारण सांगितलं असून त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काय म्हणाली आहे मानसी नाईक पाहा...

18

मानसी नाईक नवरा प्रदीपबरोबर घटस्फोट घेत असल्याचं नुकतंच तिनं सांगितलं.आता तिने एका मुलाखतीत पती प्रदीप खऱेरापासून घटस्फोट घेण्याचं खरं कारण सांगितलं असून त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

28

मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा गेल्या वर्षीच म्हणजे २०२१मध्ये जानेवारी महिन्यात लग्नबंधनात अडकले होते. त्यापूर्वीही ते दोघं लिव्ह-इनमध्ये राहत होते. आता लग्नानंतर वर्षभरातच दोघांनी घटस्फोट घेतल्यानं अनेक चर्चा होत आहेत.

38

घटस्फोट घेणार असल्याचं मानसीनं सांगितल्यानंतर याचं कारण काय असावं? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. आता या सर्व चर्चेवर मानसीनं पडदा टाकला आहे. प्रदीप खरेरावर गंभीर आरोप करत तिनं घटस्फोट घेण्याचं कारण सांगितलं आहे.

48

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मानसीनं पहिल्यांदा घटस्फोटाच्या चर्चेवर मौन सोडलं आहे. ती म्हणाली, ''माझ्या घटस्फोटाबद्दल ज्या चर्चा सुरू आहेत त्या चर्चा खऱ्या आहेत. मी खोटं बोलणार नाही. घटस्फोटासाठी अर्ज दिलाय''असं मानसीनं सांगितलं होतं.

58

आणखी एका मुलाखीत आता मानसीने घटस्फोटाचं कारण सांगताना तिनं प्रदीपबद्दल मोठा खुलासा केला आहे.

68

प्रदीपवर गंभीर आरोप करत मानसी म्हणाली की, ''काही लोक फक्त प्रसिद्धी आणि पैसा मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीशी नातं जोडतात. पैसे मिळतात, प्रसिद्धी मिळतेय तोपर्यंत ते चांगले असतात, त्यांच्याकडून मिळेल तेवढं घेतातात. असंच काही तरी माझ्यासोबत झालं.''

78

तसंच ती म्हणाली, ''सध्या यावर जास्त बोलता येणार नाही, पण बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या लवकरच सर्वांसमोर आणायच्या आहेत'' असंही मानसीनं स्पष्ट केलंय.

88

मानसी प्रदिपविषयी बोलताना पुढे म्हणाली कि, ''घटस्फोटोंच्या चर्चा सुरू झाल्यानंतर अनेक जण मला विचारत आहेत, की, लग्नकरण्यापूर्वी तुला माहीत नव्हतं का तो कसा आहे? तुला कळलं नाही का केव्हा. त्यांना मी हेच सांगेन की, लग्नापूर्वी आम्ही लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होतो. करोना लॉकडाऊनच्या काळात आम्ही एकत्रच होतो. तेव्हा सगळेच एकमेकांशी चांगले वागत होते, असं मानसी म्हणाली.

  • FIRST PUBLISHED :