NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Indra Deepu Wedding: इंद्रा दीपूचं लग्न! हळदीचे काही निवडक क्षण आले समोर

Indra Deepu Wedding: इंद्रा दीपूचं लग्न! हळदीचे काही निवडक क्षण आले समोर

झी मराठीवरील मन उडू उडू झालं ही मालिका लवकरचं प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याआधी लाडक्या इंद्रा दीपूचं लग्न प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकताच दोघांचा हळदी समारंभ पार पडला. दोघांचे हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

113

सर्वांचे लाडके इंद्रा दीपू सगळ्या आव्हानांचा सामना करुन अखेर आता लग्नबंधनात अडकणार आहेत.

213

देशपांडे आणि साळगावकरांच्या घरी दोघांच्या लग्नाची तयारी सुरू आहे.

313

नुकताच मेहंदी कार्यक्रम पार पडला. इंद्राने त्याच्या हातावर त्याच्या लाडक्या दीपिका मॅडमचं नाव काढलं.

413

मेहंदी नंतर आता इंद्रा दीपूच्या हळदीचे काही क्षणही पाहायला मिळत आहेत.

513

दीपूच्या गोऱ्या गोऱ्या गाली इंद्राच्या नावाची हळद लागली आहे. हळदीला दीपू भावूकही झाल्याच पाहायला मिळत आहे.

613

इंद्रा आणि दापूची हळद एकत्रचं लावण्यात येणार आहे.

713

नटून थटून लाजणाऱ्या दीपूला पाहून इंद्रा देखील लाजताना दिसत आहे.

813

देशपांडे आणि साळगावकर दोन्ही कुटुंब आपल्या मुलाच्या लग्नात फार आनंदी असल्याचं दिसून आहे.

913

इंद्रा दीपूला हळद लावतानाचा एक रोमँटिक क्षण कॅमेरात टिपण्यात आलाय.

1013

दोघांचं लग्न दाक्षिणात्य पद्धतीनं होणार आहे. त्या आधी हळदीला देखील साऊथ इंडियन टच इंद्रा आणि दीपूच्या लुकमध्ये पाहायला मिळतोय.

1113

दीपूने सफेद साडी आणि त्यावर हिरवं ब्लॉऊज मॅचिंग केलं आहे. तिच्या साडीच्या किनारीला गोल्डन रंगाची हटके किनार सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

1213

इंद्रा आणि दीपूच्या लग्नातही त्यांचा दाक्षिणात्य पद्धतील लूक पाहायला मिळणार आहे.

1313

प्रेक्षकांनी दोघांच्या लग्नाच्या विशेष भागासाठी उत्सुकता दाखवली आहे.

  • FIRST PUBLISHED :