झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील नेहा आणि यश प्रमाणेच शेफाली आणि समीरची जोडीही प्रेक्षकांना आवडली.
मालिकेत नेहाची मैत्रीण शेफालीनं ही प्रेक्षकांची मन जिंकली.
अभिनेत्री काजल काटे हिनं साकारलेली शेफाली अप्लावधीतच लोकप्रिय झाली.
मालिकेत शेफाली आणि समीर सरांचे सुर हळू हळू जुळू लागलेत. लवकरच दोघे लग्न करणार आहेत.
पण तुम्हाला माहिती आहे का शेफाली रिल लाइफमध्ये समीरच्या मागे असली करी रिअल लाइफमध्ये काजलनं मात्र कधीच लग्न उरकलं आहे.
काजलनं 2 वर्षांपूर्वी प्रतीक कदमबरोबर लग्न गाठ बांधली.
काजलच नवरा प्रतीकचं मुंबई इंडियन्स संघाशी खास नात आहे.
प्रतीक आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या संघाच्या टीममध्ये ट्रेनर म्हणून काम करतो.
काजल आणि प्रतीक दोघेही सोशल मीडियावर सक्रीय असून एकमेकांवर प्रेम ते व्यक्त करत असतात.
नुकतंच दोघांनी घरी गणपती बाप्पाचं स्वागत केलं. दोघांचा सुंदर फोटो काजलनं शेअर केला आहे.