अभिनेत्री प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून दररोज ती फोटो शेअर करत असते.
यावेळी प्रार्थनानं शेअर केलेले फोटो काही खास आहेत कारण हे फोटो तिचे सगळ्यात आवडते फोटो आहेत.
प्रार्थनानं स्वत: 'माय फेव्हरेट वन्स', असं कॅप्शन देत तिचे आवडते फोटो शेअर केले आहेत.
प्रार्थना हॉट लुक या फोटोमधून समोर आला आहे. टिपिकल नेहाच्या लुकमधून थेट ग्लॅमरस लुकनं प्रार्थनानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
व्हाइट स्कर्ट आणि ब्लू डिप नेक टॉपमध्ये प्रार्थना कमालीची बोल्ड आणि ग्लॅमरस दिसतेय.
सिंपल आऊटफिट पण ग्लॅमरस लुकसह प्रार्थनानं केलेलं फोटोशूट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे.
प्रार्थनाच्या या आवडत्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स, कमेंट्स आणि प्रेमाचा वर्षाव केलाय.
'ब्यूटिफूल', 'गॉर्जियस', 'अमेझिंग' अशा कमेंट्स करत चाहत्यांनी प्रार्थनावर प्रेमाचा वर्षाव केलाय.
तसंच प्रार्थनानं तिच्या फोटोशूटचा BTS व्हिडीओ देखील शेअर केलाय. ज्यात तिच्या सुंदर फोटोंसाठी तिच्या टिमने घेतलेली मेहनत दिसून आली आहे.