माही गिल आज 19 डिसेंबरला तिचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. माहीने 'देव डी', 'साहब, बीवी और गैंगस्टर', 'साहब, बीवी और गँगस्टर रिटर्न्स', 'पान सिंह तोमर' यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केलेला आहे.
माही गिलचा जन्म 19 डिसेंबर 1975 रोजी चंदीगडमध्ये एका पंजाबी कुटुंबात झाला होता. तिचं खरं नाव हे रिम्पी कौर गिल आहे. माही गिल तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असते. मीडिया रिपोर्ट्सनुसार माहिचं लग्न झालेलं नाही परंतु तिला एक मुलगी आहे. आपल्या बॉयफ्रेंडसोबत गोव्यात राहते.
माही गिलने नवभारत टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिला वेरोनिका नावाची मुलगी आहे. लग्न ही वैयक्तिक पसंती असल्याचं सांगून माही म्हणाली होती, 'लग्नाची काय गरज आहे? लग्न करून करणार काय? हे सर्व आपल्या विचार आणि वेळेवर अवलंबून असते. लग्नाशिवायही कुटुंब आणि मुलं होऊ शकतात.
माही गिलने बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी पंजाबी चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. त्याला पहिला ब्रेक 2003 मध्ये 'हवाईं' चित्रपटातून मिळाला. माहीचा पंजाबी चित्रपटसृष्टीत मोठा दबदबा आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या 'देव डी' मध्ये पारोची भूमिका साकारून माहीने खूप कौतुक मिळवलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार अनुराग कश्यपने तिला एका पार्टीत पाहिलं होतं आणि त्यानंतर तिला पारोच्या भूमिकेसाठी कास्ट करण्यात आलं.
काही बॉलिवूड चित्रपट केल्यानंतर माही 'साहब, बीवी और गँगस्टर' मध्ये जिमी शेरगिल आणि रणदीप हुड्डासोबत दिसली. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.
तिग्मांशु धुलियाच्या 'बुलेट राजा' या चित्रपटात माही गिलने पहिला आयटम नंबर केला होता.
माही ला स्वयंपाक करायला फार आवडतं. ती नॉनव्हेज खाण्याची शौकीन आहे.
माहीने एकदा सांगितलं होतं की तिला लाँग ड्राईव्हवर जायला आवडतं. त्यामुळं ती अनेकदा प्रवास करताना दिसते.