अभिनेते महेश मांजरेकर यांची कन्या गौरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. गौरी मांजरेकरांची मानलेली लेक असली तरी दोघांचं बॉडिंग फार खास आहे.
गौरी उत्तम अभिनेत्री आहेच मात्र उत्तर शास्त्रीय नृत्यांगणा देखील आहे.
गौरी भरतनाट्यम विशारद आहे. तिच्या डान्सची झलक तिच्या प्रत्येक सिनेमांमध्ये पाहायला मिळते.
मांंजरेकरांच्या लेकीनं फार कमी वेळात चांगलं सक्सेस मिळवलं आहे.
बघता बघता गौरी 22 वर्षांची झाली आहे. नुकताच गौरीनं तिचा वाढदिवस साजरा केला.
वाढदिवशी गौरीनं केलेलं फोटोशूट व्हायरल होत आहे.
मांजरेकरांची लाडकी लेक स्टनिंग पोझेस देताना दिसत आहे. तिचा फिटनेस आणि फोटोशूट तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे.
गौरी नुकत्याच आलेल्या दे धक्का 2 मध्ये सायलीच्या भूमिकेत दिसली.
त्याआधी आलेल्या पांघरुण या सिनेमात गौरी मुख्य भूमिकेत होती. पांघरुणसाठी गोरीचं प्रचंड कौतुक करण्यात आलं.