अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांचा आतापर्यंतचा संपूर्ण प्रवास आता पुस्तकरुपात प्रेक्षकांना वाचता येणार आहे.
महेश कोठारे यांचं डॅमइट आणि बरंच काही हे आत्मचरित्र्य प्रकाशित झालं आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दादरच्या शिवाजी मंदिर नाट्यगृहात महेश कोठारे यांच्या डॅमइट आणि बरंच काहीचं प्रकाशन करण्यात आलं.
मराठी सिनेजगतातील दिग्गज मंडळींनी पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
महेश यांच्या आतापर्यंतचा सिनेसृष्टीतील अनुभव त्यांनी पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
कार्यक्रमादरम्यान अनेक वर्ष सोबत काम केलेल्या अनेकांनी महेश कोठारेंबरोबर काम करतानाचे भन्नाट अनुभव सांगितले.
अभिनेते सचिन पिळगावकर, निवेदिता सराफ यांनी महेश कोठारेंबरोबर असलेल्या खास आठवणींना उजाळा दिला.
पुस्तक प्रकाशनावेळी अभिनेते अशोक सराफ प्रकृती कारणामुळे येऊ शकले नाहीत.