NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Vanita Kharat : 'मला काहीच फरक पडत नाही'; लठ्ठपणावर पहिल्यांदा स्पष्टपणे बोलली वनिता खरात

Vanita Kharat : 'मला काहीच फरक पडत नाही'; लठ्ठपणावर पहिल्यांदा स्पष्टपणे बोलली वनिता खरात

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरातनं पहिल्यांदा तिच्या लठ्ठपणाविषयी भाष्य केलं आहे. अभिनेत्रीनं काय म्हटलंय पाहा.

112

अभिनेत्री वनिता खरात महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.

212

वनिता तिच्या बिनधास्त, बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते.

312

आपल्या दमदार अभिनयानं आणि कॉमेडीच्या उत्तम टायमिंगनं प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं.

412

मध्यंतरी वनितानं केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे ती चर्चेत आली होती.

512

याच दरम्यान तिच्या टीका करण्यात आली होती. पण त्या सगळ्याला वनितानं दुर्लक्ष करत तिचं काम सुरू ठेवलं.

612

शारीरिकदृष्ट्या लठ्ठ असलेल्या वनितानं कधीच त्या गोष्टीचा बाऊ केला नाही. मात्र समाजात अनेकदा तिला यावरून बोलणी खावी लागली.

712

एका मुलाखतीमध्ये वनितानं पहिल्यांदा तिच्या लठ्ठपणाविषयी भाष्य केलं आहे. ती म्हणाली, "मी लठ्ठपणाला प्रमोट करत नाहीये. कारण लठ्ठपणा हा वेगवेगळ्या प्रकारातून येऊ शकतो".

812

"प्रत्येकाचे हार्मोन चेंजेस होऊनही लठ्ठपणा येतो. पण लठ्ठपणाला प्रमोट करतेय असं म्हणणार नाही. फिट राहणं गरजेचं आहे. कारण एका वयानंतर लठ्ठपणा आपल्यासाठी त्रासदायक होऊ शकतो".

912

"पण लठ्ठपणा वाईट आहे असं मानायचं नाही. समाजाने एक चौकट बनवून ठेवली. मग बारीक असलेला, अॅब्सला असलेला माणूस हाच सुंदरतेच्या कॅटेगिरीमध्ये येतो.ही गोष्ट चुकीची आहे".

1012

"लठ्ठपणामुळे तुमच्या शरिराला त्रास होत असेल तर ते चुकीचंच आहे. त्यामुळे त्यावर काम करणं गरजेचं आहे. पण लठ्ठपणा हा वाईट असं मी म्हणत नाही. दिसणं आणि तुमची बॉडी हे दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत. दिसण आणि फिट राहणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत".

1112

"मी जाड असून मी फिट आहे. मला काहीच फरक पडत नाही. मी छान धावू शकते, फिरू शकते, उठू शकते तर मग काय प्रोब्लेम आहे. मी फिट आहे".

1212

"पण जर मी फिट नसेल तर त्यावर आपण काम करणं गरजेचं आहे. याचा अर्थ मी त्यांच्यासारखं होणं चुकीचं आहे. मी स्वत: स्वीकारणं गरजेचं आहे".

  • FIRST PUBLISHED :