NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी आणि ओंकार रिलेशनशिपमध्ये? अखेर अभिनेत्रीने केला खुलासा

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी आणि ओंकार रिलेशनशिपमध्ये? अखेर अभिनेत्रीने केला खुलासा

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम सगळेच कलाकार चांगलेच लोकप्रिय आहेत. नुकतीच हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरातने सुमित लोंढे याच्याशी २ फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली. वनिताच्या लग्नातील प्रियदर्शनी इंदलकर व ओंकार राऊत या दोघांचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चाना उधाण आलं.आता यावर प्रियदर्शनीने मोठा खुलासा केला आहे.

18

वनिताच्या लग्नातील प्रियदर्शनी इंदलकर आणि ओंकार राऊत या दोघांचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.

28

वनिताच्या लग्नातला दोघांचा एक फोटो शेअर केला होता. यामध्ये ती ओंकारच्या छातीवर हात ठेवून हसताना दिसत होती. तर दुसरीकडे ओंकारही तिच्याकडे पाहत होता.

38

तिच्या या पोस्टवर अभिनेता आस्ताद काळेची कमेंट चर्चेचा विषय ठरली होती. आस्ताद म्हणाला होता, ‘ज्या पद्धतीने ओंकार तुझ्याकडे पाहत आहे, एकत्र आणि आनंदी राहा मित्रांनो’, त्याच्या या कमेंटला प्रियदर्शनीने देखील रिप्लाय दिला होता.

48

त्यांनतर ओंकार आणि प्रियदर्शनी दोघेही एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र या दोघांनीही या चर्चांवर मौन कायम राखलं.

58

आता प्रियदर्शनीने स्वतःच ओंकार व तिच्या नात्याबाबत भाष्य केलं आहे.

68

राजश्री मराठीच्या एका मुलाखतीमध्ये प्रियदर्शनीला ओंकारबरोबरच्या नात्याबाबत विचारण्यात आलं. तेव्हा प्रियदर्शनी म्हणाली, “माझा पहिलाच चित्रपट (ती फुलराणी) येत आहे. इतक्या लवकर माझ्याबाबतीत कॉन्ट्रोवर्सी कशी काय घडली?”

78

ती पुढे म्हणाली कि, 'आस्ताद काळेने आमच्या दोघांच्या फोटोंवर एक कमेंट केली. त्यावर मी गंमतीशीर रिप्लाय केला. पण त्या एका गोष्टीमुळे एवढी चर्चा होईल असं मला खरंच वाटलं नव्हतं.'

88

दोघांच्या नात्याविषयी ती म्हणाली कि, 'पण असं काहीही नाही. आम्ही दोघं खूप चांगले मित्र आहोत. काम करताना मैत्री वाढत जाते. हे इतकंच आहे. लोकांना आमच्यामध्ये प्रेम दिसत आहे. हे म्हणजे लोकांचंच आमच्यावर असलेलं प्रेम आहे. आमच्यामध्ये फक्त मैत्रीचं नातं आहे.' असं प्रियदर्शनीने सांगितलं आहेत.

  • FIRST PUBLISHED :