NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Vanita Kharat: 'लग्नापूर्वी माझे अफेअर्स...' हास्यजत्रा फेम वनिता खरातचा खासगी आयुष्याबाबत मोठा खुलासा

Vanita Kharat: 'लग्नापूर्वी माझे अफेअर्स...' हास्यजत्रा फेम वनिता खरातचा खासगी आयुष्याबाबत मोठा खुलासा

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात चाहत्यांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. मध्यंतरी तिने सुमित लोंढेशी लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नाचे फोटो चांगलेच व्हायरल झाले. मात्र आता लग्नानंतर खाजगी आयुष्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे वनिता पुन्हा चर्चेत आली आहे.

18

महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून वनिता खरात हे नाव आता महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं आहे.

28

वनिता सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या लग्नापुर्वीच्या आयुष्याबद्दल सांगितलं आहे.

38

वनिताने नुकतीच सुमित लोंढे याच्यासोबत लग्नगाठ बांधली. सुमित आणि वनिता यांच्यात आधी मैत्री आणि नंतर प्रेम झालं. त्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.

48

वनिताने नुकताच संपूर्ण स्वराज या चॅनेलसोबत एक पॉडकास्ट केला आहे. यात तिने तिच्या लग्नापुर्वीच्या नात्याबद्दल सांगितलं आहे.

58

लग्नापुर्वीच्या नात्यांबद्दल बोलताना वनिता म्हणाली, 'लग्नापूर्वी माझे अफेअर्स होते. मात्र एका क्षणानंतर आता अफेअर्स करायचे नाहीत असं मी ठरवलं.'

68

ती पुढे म्हणाली कि, 'पण अफेअर करायचं नाही म्हणजे लगेच लग्न करायचं असा काही विचार नव्हता. कारण मला त्याआधी खूप अनुभव आले होते. ते कसे अनुभव असतील याचा अंदाज तुम्ही लावू शकता. त्यामुळे लगेच लग्न करायच नाही असं ठरवलं.'

78

'त्यानंतर सुमित भेटला. आम्ही रिलेशनमध्ये आलो आणि आमचं लग्न करायचं ठरलं. शेवटी लग्नाचा निर्णय घेतला आणि तोच फायनल डिसीजन होता.' असं वनिताने सांगितलं आहे.

88

वनिता नेहमीच तिच्या खासगी आयुष्याबाबत खुलेपणाने बोलताना दिसली. वनिताने केलेल्या या खुलाश्याने चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे.

  • FIRST PUBLISHED :