महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातून प्रेक्षकांना हास्याची मेजवानीच मिळत असते. या शोमधील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात.
आता या शो मध्ये एका नव्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये अभिनेत्री अश्विनी कासार एंट्री घेणार आहे.
आजवर सुख म्हणजे नक्की काय असतं, कमला यासारख्या मालिकांमध्ये विविध भूमिका साकारणारी अश्विनी पहिल्यांदाच विनोदी अंदाजात पाहायला मिळणार आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी अभिनेत्री अश्विनी कासार खूपच उत्सुक आहे.
तिने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय कि, 'आज रात्री ९ वाजता मी येत आहे तुमच्या, आमच्या, संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या कार्यक्रमात..!! महाराष्ट्राची हास्यजत्रा..!!'
याच पोस्टमध्ये तिने पुढे म्हटलंय कि, 'मला ही संधी दिल्याबद्दल महाराष्ट्राची हास्यजत्रा टीमचे खूप खूप आभार.'
अश्विनीला आता हास्यजत्रेत पाहायला चाहते उत्सुक असून कलाकार मित्र आणि चाहते तिचं अभिनंदन करत तिला शुभेच्छा देत आहेत.
महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील लोकप्रिय अभिनेत्री नम्रता संभेराव काही दिवसांसाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर असून तिची जागा आता अश्विनीने घेतली आहे.