महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात अखेर आज लग्नबंधनात अडकली आहे.
दोघांच्या लग्नसोहळ्याचे फोटो नुकतेच समोर आले आहेत.
वनिता नववधूच्या वेशात खूप सुंदर दिसत आहे.
वनिता आणि सुमितच्या लग्नाची सगळीकडेच चर्चा होती. आता अखेर दोघे लग्नाच्या बंधनात अडकले आहेत.
महाराष्ट्राची हास्यजत्रेची टीम सुद्धा या दोघांच्या लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी झाली आहे.
वनिताच्या हळदीचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
सगळे मिळून मज्जा करताना दिसून आले होते.
या जोडप्यावर आता चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.