कर्नाटकातील कोकणी मराठी कुटुंबात जन्मलेल्या लीला चंदावरकर (लीना चंदावरकर) यांनी लहानपणापासूनच नायिका बनण्याचे स्वप्न पाहिले आणि स्वतःच्या अटींवर आयुष्य जगले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा ती तिच्या करिअरच्या शिखरावर होती, तेव्हा तिने गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचा मुलगा सिद्धार्थ बांदोडकर यांच्याशी लग्न केले होते.
सिद्धार्थ बांदोडकर हे उद्योगपती होते. 1975 मध्ये त्यांनी लीनाशी लग्न केले. लग्नानंतर काही दिवसातच त्यांचा अपघात झाला. रिपोर्ट्सनुसार, तो रिव्हॉल्व्हर साफ करत असताना त्याने चुकून स्वतःवर गोळी झाडली. सुमारे 11 महिने त्यांच्यावर उपचार करण्यात आले, परंतु त्यांना वाचवता आले नाही आणि लीना चंदावरकर वयाच्या 25 व्या वर्षी विधवा झाल्या.
पती सिद्धार्थच्या मृत्यूनंतर लीना डिप्रेशनमध्ये गेली होती. आई-वडील मुलीला घरी घेऊन आले. लोक तिला मांगलिक म्हणायचे आणि विधवा असल्याची टिंगल करायचे. काही काळानंतर, तिचे अपूर्ण चित्रपट पूर्ण करण्यासाठी ती मुंबईला परतली.
1976 मध्ये लीनाने किशोर कुमार दिग्दर्शित 'प्यार अजनबी है' चित्रपट साइन केला. दोघांमध्ये प्रेम फुलले, जरी किशोर दा यांनी तिला लग्नासाठी प्रपोज केले तेव्हा तिने नकार दिला. खूप समजावून सांगितल्यावर लीनाने लग्नाला होकार दिला, पण तिचे वडील या लग्नाला विरोध करत होते, कारण किशोर कुमारने तीनदा लग्न केले होते.
असे म्हटले जाते की किशोर दा लीनावर इतके प्रेम करत होते की त्यांनी कर्नाटकातील धारवाड येथे तिच्या घरी जाऊन एक गाणे गायले होते. त्यांचं गाणं ऐकून लीनाचे वडिल भावुक झाले. ते लीनाचे किशोर दासोबत लग्न लावण्यास तयार झाले.
बातम्यांनुसार, लीनाने किशोर दा यांच्याशी तिने लग्न केलं तेव्हा ती गर्भवती होती. लीना आणि किशोर कुमार यांनी दोनदा लग्न केले होते. पहिला कोर्ट मॅरेज होता आणि दुसरा विवाह हिंदू रितीरिवाजाप्रमाणे झाला होता.
लीना आणि किशोर दा यांचा सहवास फार काळ टिकला नाही. किशोर कुमार यांचे 1987 मध्ये निधन झाले आणि लीना वयाच्या 37 व्या वर्षी पुन्हा विधवा झाल्या. लीना आज 72 वर्षांची आहे आणि सावत्र मुलगा अमित आणि खरा मुलगा सुमितसोबत मुंबईत राहते.