गौतमी पाटील हे प्रकरण मागच्या अनेक दिवसांपासून सातत्यानं चर्चेत आहे.
गौतमीच्या अश्लिल डान्स वरून अनेक जण टीका करत आहेत.
बिग बॉस फेम अभिनेत्री मेघा घाडगेनं गौतमीवर निशाणा साधला होता.
दरम्यान आता लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी गौतमी पाटीलवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे.
सुरेखा पुणेकरांनी टीव्ही9 शी बोलताना गौतमी पाटीवर अप्रत्यक्षरित्या टीका केला.
सुरेखा पुणेकर म्हणाल्या, 'ज्या लावणी सम्राज्ञीकडे कला आहे तिला प्रोत्साहन द्या. अपुरे कपडे घालणे आणि अश्लील वर्तन करत नाचणं याला लावणी म्हणत नाही'.
'तसच जी लावणीसम्राज्ञी अंगविक्षेप करून कला सादर करते तिला लोकं सोडणार नाहीत. लावणी ही योग्य प्रकारेच सादर केली पाहिजे. नाहीतर महिला स्टेजवर जाऊन मारतील'.
सुरेखा पुणेकरांनी पुढे म्हटलंय, 'जी खरंच कलाकार आहे. जिची कला चांगली आहे तिला तुम्ही नक्कीच डोक्यावर घ्या तिला सपोर्ट करा'.
'पण जी अपूरे कपडे घालेल, अश्लील वर्तन करेल तिला अजिबात स्थान देऊ नका नाहीतर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही', असं सुरेखा पुणेकर म्हणाल्या.