झिम्माच्या सक्सेसनंतर हेमंत ढोमेनं सनी हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.
सिनेमात अभिनेता ललित प्रभाकर सनीच्या प्रमुख भूमिकेत आहे. शिवाय अभिनेता चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत.
प्रिव्ह्यू शोला तरूणांपेक्षा तरूणींचींच जास्त गर्दी पाहायला मिळाली.
शो संपल्यानंतर ललित आणि सिनेमाच्या टीमनं थिएटरमध्ये एंट्री घेतली.
यावेळी सगळ्या कलाकरांनी प्रेक्षकांशी संवाद साधला.
महाराष्ट्राचा लाडका चॉकलेट बॉय ललित प्रभारकरला पाहण्यासाठी तरुणींनी थिएटरमध्ये गर्दी केली होती. ललित थिएटरच्या बाहेर येताच तरुणींनी त्याच्याभोवती गराडा घातला.
ललितबरोबर सेल्फी, ऑटोग्राफ घेण्यासाठी थिएटर बाहेर रांगा लागल्या होत्या.
इतकंच नाही तर काही तरुणींनी आपल्या हातावर ललितची ऑटोग्राफ घेतली.