गौतम विरानी म्हणजेच अभिनेता सुमीता सचदेवची 'क्योंकि सास भी कभी बहु थी' ही मालिका 2002 ते 2008पर्यंत तुफान चालली.
2018पर्यंत अभिनेता अनेक लहान मोठ्या भूमिका साकारत होता. पण त्यानंतर मागील 5 वर्षांपासून अभिनेता गायब आहे.
5 वर्षांनी अभिनेता सुमीत सचदेव यांनी कमबॅक केलं आहे. अभिनेत्याचा पूर्णपणे बदललेला लुक सर्वांसमोर आला आहे.
अभिनेता सुमीत सचदेवनं मागच्या 5 वर्षांत स्वत:मध्ये खूप बदल केलेत. त्याचा संपूर्ण लुक बदलला आहे. अभिनेत्याला ओळखता येणं देखील कठीण झालं आहे.
सुमीत सचदेवनं मागील माहिन्यात चाशनी या मालिकेतून कमबॅक केलं आहे. मालिकेत तो निगेटिव्ह भूमिकेत आहे. सुमेर बब्बर नावाची भूमिका तो साकारत आहे.
नव्या मालिकेत सुमीत सचदेवचा लुक बदलला आहे. त्यानं त्याच्या सोशल मीडियावर फोटो शएअर केलेत. ते फोटो पाहून अभिनेत्याला ओळखणं देखील मुश्किल झालं आहे.
अभिनेता सुमीत सचदेवनं 15 किलो वजन कमी केलं आहे. इतकंच नाही तर त्यानं त्याचे हेअर स्टाइल देखील बदलली आहे. त्यानं केस वाढवले असून त्याला व्हाइट कलर दिला आहे.
ये है मोहब्बते या मालिकेत सुमीत शेवटचा दिसला होता. त्यात त्यानं अभिमन्यु राघव उर्फ मणि ही भूमिका साकारली होती. त्यानंतर आता ते चाशनी या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहेत.