कॉमेडियन आणि अभिनेता कृष्णा अभिषेकच्या परिचयाची गरज नाही. 'द कपिल शर्मा शो'मध्ये सपनाचे पात्र साकारल्यानंतर तो घराघरात लोकप्रिय झाला.
सप्टेंबर 2022 मध्ये कपिल शर्मा शोचा नवीन सीझन सुरू होण्यापूर्वी, कृष्णा नवीन सीझनचा भाग नसल्याची माहिती समोर आली होती.
हा शो सोडण्यामागे त्याला दिलं जाणारं कमी मानधन हे कारण होतं. पण आता कृष्णा शोमध्ये परतणार आहे, तसेच तो एका एपिसोडसाठी किती मानधन घेतो याची माहिती देखील समोर आली आहे.
प्रेक्षकांची आवडती सपना उर्फ कृष्णा अभिषेक भारतातील प्रसिद्ध रिअॅलिटी शो द कपिल शर्मा शोमध्ये धमाकेदारपणे परतली आहे. चाहते या एपिसोडची आतुरतेने वाट पाहत आहेत.
नुकत्याच झालेल्या मुलाखतीत कृष्णाने या शो मध्ये पैशाची समस्यासुटल्यानं परत आल्याचं सांगितलं होतं. आता कृष्णाला पाहिजे तेवढं मानधन मिळालं असं दिसतंय.
सियासतच्या रिपोर्टनुसार, कृष्णा प्रत्येक एपिसोडसाठी 10-12 लाख रुपये घेतो.
रिपोर्ट्सनुसार, कृष्णा प्रत्येक एपिसोडसाठी 10 लाखांपेक्षा जास्त फी घेत. मात्र, नेमके शुल्क किती आहे हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
गोविंदाचा भाचा असलेल्या कृष्णाने विनोदाच्या जगात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.