अनेकदा सिनेमाची कथा चांगली असते पण कलाकारांचं कास्टिंग चुकीचं ठरतं. कथा कितीही उत्तम असली त्या कथेत काम करणारे कलाकारच प्रेक्षकांना पटलेले नाहीत. कथेपेक्षा सिनेमातील कलाकारांचंच निगेटीव्ह इम्प्रेशन पडताना दिसत आहेत. एका चुकीमुळे फ्लॉप झालेल्या सिनेमांची लिस्ट पाहूयात.
यातील पहिला सिनेमा म्हणजे सम्राट पृथ्वीराज. अभिनेता अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत असलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या काही पसंतीस उतरला नाही. या सिनेमात अक्षयला कास्ट करणं ही निर्मात्यांची मोठी चूक असल्याचं म्हटलं जातंय. अक्षय कुमार सम्राट पृथ्वीराजच्या जवळपास देखील जात नाही असं प्रेक्षकांनी म्हटलं. सिनेमा 2 आठवडे देखील थिएटरमध्ये टिकू शकला नाही.
सलमानच्या किसी का भाई किसी की जान सिनेमाप्रमाणेच त्याचा ट्युबलाइट हा सिनेमा देखील फ्लॉप ठरला होता. सलमान खाननं सिनेमात ओव्हर अँक्टिंग केल्याचं प्रेक्षकांनी म्हटलं. हा सिनेमा देखील फार काळ थिएटरमध्ये टिकला नाही.
फ्लॉप सिनेमातील यादीतील पुढचा सिनेमा आहे तो म्हणजे लव आज कल. अभिनेत्री सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या सिनेमाला प्रेक्षकांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिला नव्हता. कलाकारांच्या ओव्हर अँक्टिंगच्या मुद्द्यांवर चांगलंच ट्रोलिंग करण्यात आलं होतं.
करण जोहरचा मल्टिस्टारर सिनेमा कलंक देखील सुपर फ्लॉप ठरला होता. अभिनेता वरूण धवन, आलिया भट्ट, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त हे कलाकार यात प्रमुख भूमिकेत होते.
2019मध्ये आलेल्या आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित पानीपत सिनेमाची देखील अशीत हालत झाली. अर्जुन कपूर प्रमुख भूमिकेत असलेल्या या सिनेमात कास्टिंग चुकल्याचं प्रेक्षकांनी म्हटलं होतं.
क्रिकेटर मोहम्मल अजहरूद्दीन यांच्या आयुष्यावर आधारित अजहर हा सिनेमा देखील फ्लॉप ठरला. इमरान हाशनी यात प्रमख भूमिकेत होता.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि हसीना पारकर यांच्यावर आधारित हसीना पारकर या सिनेमात अभिनेत्री श्रद्धा कपूर वेगळ्या अंदाजात दिसली होती. पण हा सिनेमा फार काळ थिएटरमध्ये टिकू शकला नाही.