होळीच्या निमित्ताने सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी त्यांच्या हळदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
हळदीच्या सोहळ्यात कियारा आणि सिद्धार्थ खूप खुश दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर लग्नाची चमक दिसत आहे.
दोघे हळदीत चांगलेच माखलेले दिसत आहेत.
हळदी समारंभात कियारा आणि सिद्धार्थ एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले दिसत होते. चाहतेही या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
कियाराने होळीच्या मुहूर्तावर हे फोटो शेअर करत चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कियारा आणि सिद्धार्थने ७ फेब्रुवारीला जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला आज एक महिना पूर्ण झाला आहे.
कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नापूर्वी सूर्यगढ पॅलेसमध्ये हळदीपासून मेहंदी लावण्यापर्यंतचे विधीही पार पडले.
कियाराने अलीकडेच एका मुलाखतीत, सिद्धार्थ हा एक आदर्श पती आहे. तो सर्वांचा आदर करतो. लग्नानंतर ते दोघे खूप आनंदी आहेत आणि हा टप्पा खूप सुंदर आहे.' असे सांगितले आहे.