कियाराने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राशी लग्नगाठ बांधली आहे. दोघेही कायम चर्चेत असतात.
कियाराचं लग्नानंतर प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट 'सत्यप्रेम की कथा' हा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे.
कियारा अडवाणीने नुकतंच एका मुलाखतीत सिद्धार्थ मल्होत्राची आई आणि तिची सासू रीमा मल्होत्रा यांच्याशी संबंधित एक मनोरंजक किस्सा सांगितला आहे केला.
मिर्ची प्लसला दिलेल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कियारा अडवाणीला पाणीपुरीबद्दल विचारण्यात आले होते की तिला ते ओव्हररेट केलेले फास्ट फूड वाटते का? यावर अभिनेत्रीने दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे.
यादरम्यान कियारा अडवाणीने असेही सांगितले की, अलीकडेच तिची सासू मुंबईत आली आहे आणि या दोघांसोबत घरी राहते आहे. यावेळी सासूला इम्प्रेस करण्यासाठी कियारानं एक भन्नाट गोष्ट केली. याच्यासाठी पाणीपुरीच तिच्या कामी आली.
कियारा अडवाणीला विचारण्यात आले की, तिच्या लग्नात पाणीपुरीचा स्टॉल आहे का? यावर अभिनेत्री म्हणाली, "नक्कीच. माझ्या सासूबाईंना पाणीपुरी खूप आवडते! त्या दिल्लीच्या आहेत पण सध्या आमच्यासोबत मुंबईत येऊन राहत आहेत. त्या येताच मी घरात पाणीपुरी करायला सांगितली.''
ती पुढे म्हणाली, ''मी असा त्यांना मस्का लावला की त्या खूपच आनंदी झाल्या.''