त्याचप्रमाणे एपिलेप्सीसारख्या आजारावर ती जनजागृती करताना दिसते. दरम्यान केतकीनं एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं तिच्या डेंटल ट्रिटमेंटची माहिती दिली आहे.
नुकतीच दिप अमावस्या झाली. या दिवशी घरी दिव्यांची आरास मांडून पूजा केली जाते. कणकेचे दिवे बनवून ते खाल्ले देखील जातात. केतकीच्या घरी देखील दिपपूजन करण्यात आलं. त्याचे फोटो तिनं शेअर केलेत.
पण ऐन दिप अमावस्येच्या रात्री केतकीला तिच्या दातामुळे काही खाणं शक्य झालं नाही. तिचे तीन दात काढल्याचं सांगितलं. तिनं पोस्ट शेअर करत ही माहिती दिलीये.
केतकीनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "3 दात काढले आहेत. बोलता येत नाहीये. नीट काही खाता येत नाहीये. मळमळ, वर्टीगो, सर्व चालू आहे त्या एंटिबायोटिक्समुळे".
"आज दीप पूजन म्हटल्यावर दिवे तर झालेच पाहिजेत. आगाऊपणा बघा, तोंड उघडता येत नसले तरी दिवे खायचे नाही", असे कसे असं केतकीनं म्हटलं आहे.