NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'बाईपण भारी देवा'ची गाडी दहाव्या दिवशीही सुसाट! दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाची छप्परतोड कमाई

'बाईपण भारी देवा'ची गाडी दहाव्या दिवशीही सुसाट! दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाची छप्परतोड कमाई

सध्या बॉक्स ऑफिसवर एका मराठी चित्रपटाचा बोलबाला आहे तो म्हणजे केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा'. चित्रपटाला प्रदर्शित होऊन दहा दिवस उलटले असले तरी अजूनही कमाईचा आकडा वाढतच आहे. दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी चित्रपटाने किती कमाई केली जाणून घ्या.

18

दिग्दर्शक केदार शिंदे यांचा बहुचर्चित चित्रपट 'बाईपण भारी देवा'ला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

28

30 जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला महाराष्ट्रात ठिकठिकाणी बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्लचा बोर्ड लागला आहे.

38

मोठी स्टारकास्ट असलेल्या 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाने पहिल्याच वीकएण्डला 6.45 कोटींचा गल्ला जमवला होता. त्यामुळे हा चित्रपट पहिल्याच आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा या वर्षातला सुपरहिट मराठी चित्रपट ठरला आहे.

48

आता दुसऱ्या आठ्वड्यापर्यंत चित्रपटाची कमाईत जवळजवळ तिप्पट वाढ झाली आहे.

58

सोमवार 10 जुलै पर्यंत चित्रपटाने 26. 19 कोटींचा गल्ला जमवला आहे.

68

त्यामुळे हा या वर्षातील आतापर्यंतचा सगळ्यात जास्त सुपरहिट चित्रपट ठरू शकतो.

78

महाराष्ट्रात महिला वर्ग या चित्रपटाला अजूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहे.

88

येणाऱ्या आठवड्यात चित्रपटाच्या एकूण कमाईत अजून वाढ होऊ शकते.

  • FIRST PUBLISHED :