बॉलीवूडचे पॉवर कपल विकी कौशल आणि कतरिना कैफही नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी एका खास ठिकाणी पोहोचले आहेत.
पती विकी कौशलसोबत काही वेळ घालवण्यासाठी कतरिनाही मुंबईपासून दूर राजस्थानला पोहोचली आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने सोशल मीडियावर बरेच फोटो शेअर करून तिच्या व्हेकेशनची झलक चाहत्यांसह शेअर केली आहे.
कतरिना कैफ आणि विकी कौशल सध्या राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील जवाई डॅम येथे आहेत.
विकी-कॅट या ठिकाणी जंगल सफारीचा आनंद लुटत आहेत.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये कतरिना कैफने राजस्थानची सुंदर दृश्ये दाखवली आहेत. तिने शेअर केलेल्या या फोटोत विविध प्राणी दिसत आहेत.
राजस्थानमधील अभयारण्यात विकी आणि कतरिनाचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळतोय.
विकी आणि कतरिनाचे हे रोमँटिक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
कतरिना लवकरच सलमान खानसोबत 'टायगर 3'मध्ये दिसणार आहे. दुसरीकडे, विकी नुकताच OTT वर रिलीज झालेल्या 'गोविंदा नाम मेरा' चित्रपटात दिसला होता.